भाजप
भाजप sakal

Mumbai BJP :पेण एपीएमसीवर भाजपचा झेंडा

दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाजार समितीची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली होती.

पेण - पेणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली असून १८ पैकी १७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. एक जागा या अगोदरच मविआची बिनविरोध झाल्याने यातच त्यांना समाधान मानावे लागले आहे.


रविवारी (ता. ३०) पेण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये १२६१ पैकी ११७८ मतदान झाले. यामध्ये सहकार क्षेत्रातून उभे असलेले भाजपचे रामदास घासे, संदेश ठाकूर, जयवंत नारकर, सुरेश पाटील, हरिचंद्र पाटील, महादेव मानकर, कृष्णा म्हात्रे, शेवंती ठाकूर, जयप्रभा म्हात्रे, नितीन पाटील हे १० उमेदवार; ग्रामपंचायत गटामधून पूजा पाटील,

भाजप
Mumbai : जिल्हाधिकारी कार्यालयात रोज ‘लोक दरबार’ भरणार; पालकमंत्री लोढा

महेश पाटील, जोमा दरवडा आणि सुधीर पाटील हे चार; तर व्यापारी-आडते गटातून सतीश पाटील, सुहास पाटील; हमाल तोलारीमधून काशिनाथ पाटील असे १७ भाजप आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे वडखळ येथील संतोष चव्हाण हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बाजार समितीची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली होती; परंतु आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे कमळ फुलले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com