गरजू महिलांना शिवणकला प्रशिक्षण

गरजू महिलांना शिवणकला प्रशिक्षण

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तसेच महिला व बालविकास अधिकारी पल्लवी जाधव व समाजसेविका प्रियांका दामले यांच्या पुढाकाराने, बदलापुरात गरजू व विधवा महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण व शिवणयंत्राचे वाटप करण्याचा कार्यक्रम बदलापूर पश्चिम बेलवली येथील यशस्विनी भवन येथे पार पडला. शहरातील गरजू व आधारहीन विधवा अशा एकूण १०० महिलांना या वेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या स्वावलंबनासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तीन टक्के निधीतून हा उपक्रम बदलापूर शहरात राबविण्यात येत आहे. २ मे रोजी सुरू झालेल्या या दहादिवसीय प्रशिक्षण शिबिरात अनेक महिलांनी सहभाग घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com