दळखण ग्रामपंचायत कार्यालय अडगळीत

दळखण ग्रामपंचायत कार्यालय अडगळीत

खर्डी, ता. ८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील अनेक शासकीय पुरस्कार प्राप्त दळखण ग्रामपंचायत कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांना एकाच खोलीत बसावे लागत असून, त्याच खोलीत ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची कपाटेही असल्याने कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना दाटीवाटीने कामे करावी लागत आहे. यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे दळखण ग्रामपंचायतीची स्वतःच्या मालकीची १० गुंठे जमीन असूनही नवीन कार्यालय होत नसल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
संपूर्ण गावात वायफाय, घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्यातील पहिली ई -घंटागाडी, स्नेक कॅचर कीट, सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रामपंचायतीचा दवाखाना, फायर सेफ्टी किट, गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन नंबर अशा विविध योजना राबवून आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी येथील आजी/माजी सरपंच, उपसरपंच व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने दळखण ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांना अत्याधुनिक नविन सुविधा देत आहे. परंतु कार्यालय सिमेंट पत्र्याच्या घरात खुराड्यात असल्याने येथे काम करताना कर्मचारी व गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी येथील पदाधिकारी ठाणे जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत आहेत.
दळखण ग्रामपंचायत कार्यक्षेत्राची लोकसंख्या २२०० च्या आसपास असून चार आदिवासी पाडे आहेत. संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता, तंटामुक्त गाव, हागणदारी मुक्त गाव यासारखे शासनाची पारितोषिक मिळाले आहेत. या गावात जलस्वराज पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे सुरू आहे. तरीही दळखण ग्रामपंचायतीचे कार्यालय दुरवस्थेत आहेत.
...
रस्त्याचीही दुरवस्था
दळखण ते काष्टी गावाजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने या गावच्या रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे हा रस्ता काँक्रिट करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख भाई देहेरकर यांनी केली.
--------------------------------------–----------------------------
दळखण ग्रामपंचायतच्या कार्यालयाकरिता १० गुंठे जमीन उपलब्ध आहे. येथे कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
- लवेश वाघ, सरपंच, दळखण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com