कळवा-मुंब्रा स्थानकांत जलद लोकल थांबा द्या!

कळवा-मुंब्रा स्थानकांत जलद लोकल थांबा द्या!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कळवा व मुंब्रा रेल्वेस्थानकांत सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत काही जलद लोकलना थांबा द्या आणि कल्याण ते टिटवाळा-बदलापूरदरम्यानच्या स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवून १५ डबा गाड्यांची संख्या वाढवा, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात एक निवेदन मध्य रेल्वेच्या विभागीय व्यस्थापकांना देण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवासी वाढत असून सुविधेच्या अभावामुळे त्यांचे लोकल प्रवासात मोठे हाल होत आहेत. त्याची दखल घेत संस्थेने विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेला दिले आहे. कळवा व मुंब्रा स्थानकांत सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळेत काही जलद लोकलना थांबा देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल लोकलची संख्या वाढवणे, वसई-दिवा- पनवेल- रोहा सेक्शनवर मेमू लोकलच्या फेऱ्या वाढवणे, त्या मार्गावर शनिवार-रविवारी बंद ठेवल्या जाणाऱ्या मेमू सेवांच्या फेऱ्या आठवड्यातील सर्व दिवस चालवाव्यात इत्यादी मागण्या संस्थेकडून करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेनेही अधिक संख्येने पंधरा डबा लोकल चालवण्याची सध्या गरज आहे. त्याशिवाय गर्दीच्या स्थानकांत जलद लोकलना थांबा देण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करता येणार आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

संस्थेच्या अन्य मागण्या
- कल्याण रेल्वेस्थानकांचे रिमॉडेलिंगचे काम त्वरित सुरू करणे.
- डेक्कन क्विन, राजधानी व दुरांतो एक्स्प्रेसखेरीज सर्व मेल/ एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकात थांबवणे.
- कोकण रेल्वेवरील रत्नागिरी-दिवा व सावंतवाडी-दिवा पॅसेंजर दादरहून चालवणे.
- तिसऱ्या कॉरिडॉरवर डोंबिवली व घाटकोपर स्थानकांत फलाट बांधणे.
- ठाणे रेल्वेस्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी सर्व पूल एकमेकांना जोडण्यात यावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com