मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्त अखेर सेवेत

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्त अखेर सेवेत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : मध्य वैतरणा प्रकल्पात बाधित मोखाडा तालुक्यातील कारेगावच्या कुटुंबांना अखेर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. या कुटुंबांतील १८ तरुण मुंबई महापालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत.
२००५ मध्ये मध्य वैतरणा धरण प्रकल्पासाठी मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील जमीन संपादित करण्यात आली होती. या धरणातून मिळणाऱ्या पाण्याने ठाणे-मुंबई परिसराची तहान भागली; मात्र त्यानंतर १६ वर्षे या प्रकल्पात बाधित झालेल्या आदिवासी कुटुंबांना कोणताही मोबदला मिळाला नाही. बाधित जमिनीवर ही कुटुंबे वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. त्यानंतर मात्र प्रकल्पात जमीन गेल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधनही गेले आणि मोबदलाही मिळाला नाही. जमिनीचा मोबदला मिळावा, कुटुंबातील तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी अखेर दोन वर्षांपूर्वी ठाण्यात येऊन आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. आमदार केळकर यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुंबई महापालिकेने बाधित कुटुंबांतील १८ तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.

------------------
या तरुणांना मिळाली नोकरी
महादू झुगरे, नंदू सराई, देवचंद कातवारे, प्रवीण झुगरे, रूपेश शिद, अंकुश वळवी, बुधा आघान, रवींद्र झुगरे, कैलास वाजे, संदीप वाजे, देवीदास फसाळे, रवीदास वाजे, सुनील वाजे, गुरुदेव खडके, राजू कामडी, आकाश सराई, अंकुश झुगरे आणि पुंडलिक फसाळे अशी १८ लाभार्थ्यांची नावे असून त्यांना मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यात सेवेत घेण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com