गावठाणातील घर विक्रीतून फसवणूक

गावठाणातील घर विक्रीतून फसवणूक

नवी मुंबई (वार्ताहर): घणसोलीतील गावठाणात उभारण्यात येत असलेल्या इमारतीतील सदनिका विकण्याचे आश्वासन देऊन एका बांधकाम व्यावसायिकाने पाच व्यक्तींकडून तब्बल २२ लाख ६६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. वसीम ऊर्फ साहिल मुकादम असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
घणसोलीतील गावठाण परिसरात बांधकाम सुरु असल्याची माहिती नितीन रामिष्टे (२८) यांना २०२० मध्ये त्यांच्या मामाकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे नितीन यांनी त्यांच्या इतर नातेवाईकांसह ऑक्टोबर २०२० मध्ये वसीम उर्फ साहिल मुकादम याची एपीएमसीतील कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी वसीमने के.व्ही.कन्सट्रक्शन भागीदार असल्याचे तसेच त्यात इतर तीन भागीदार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी कोपरखैरणे, वाशी व ऐरोली भागात अनेक बांधकामे केली असल्याचे सांगितले. वसीमने ३,८५० रुपये प्रति चौ. फुटप्रमाणे फ्लॅट विकत देण्याची तयारी दर्शवून एक वर्षामध्ये घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे नितीनसह इतर पाच नातेवाईकांनी वसीमला २२ लाख ६६ हजाराची रक्कम दिली. मात्र, त्यानंतर वसीमकडे फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची मागणी केली असता वेळोवेळी टाळाटाळ करत होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com