ठाणेकरांनी रिचवली ९७ लाख लिटर बिअर

ठाणेकरांनी रिचवली ९७ लाख लिटर बिअर

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून घशाला कोरड पडत आहे. या उन्हाळ्यात घशाला पडणारी कोरड शमवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मद्यपींनी गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९७ लाख ६७ हजार ७९७ लिटर बिअर रिचवली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघड केलेल्या या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात ३ लाख ६० हजार लिटर बिअरची अधिक विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी वातवरणात कमालीची उष्णता वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यात अवकाळी पावसाचे आगमन यांमुळे गारवा आणि उन्हाळा असा विचित्र निर्संगाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. यातून वातवरणात झालेल्या बदलामुळे यंदा ‘ऊन जरा जास्त’ असल्याचे जाणवू लागले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे शहरातील रस्त्यांवर कैरीचे पन्हे, ताक, लिंबू सरबत यांच्या गाड्यांकडे घशाला वारंवार पडणारी कोरड शमवण्यासाठी नागरिक धाव घेत असल्याचे चित्र दिसून येत असते; तर दुसरीकडे ऋतुमानाप्रमाणे मद्यप्रकार बदलण्यात पटाईत असलेल्या तळीरामांनी मात्र आपला मोर्चा बिअरकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. तळीरामांनी यंदा आधीच्या वर्षांचे विक्रमही मोडीत काढले. त्यामुळेच यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बिअरची सर्वाधिक विक्री झाली. मे महिन्यात तर हा विक्रमही मागे पडण्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
.....
तीन लाख ६० हजार लिटरने अधिक विक्री
ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार तळीरामांनी उन्हाळ्यात ९७ लाख ७६ हजार ७९७ लिटर बिअरचा रिचवल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात ४७ लाख ९२ हजार ४७०; तर एप्रिल महिन्यात ४९ लाख ७४ हजार ७९७ अशी ९७ लाख ७६ हजार ७९७ इतकी बिअरची विक्री करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी मार्च २०२२ मध्ये ४६ लाख ८१ हजार ८८०; तर एप्रिल २०२२ मध्ये ४७ लाख २५ हजार १५० अशी ९४ लाख ७ हजार ३० लिटर बिअर विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्य वर्षी ३ लाख ६० हजार लिटर अधिक बिअरची विक्री झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com