पालिका परिचारिकांचा उद्या मुख्यालयावर मोर्चा

पालिका परिचारिकांचा उद्या मुख्यालयावर मोर्चा

मुंबई, ता. १० ः कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहायक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांचा शुक्रवारी (ता. १२) दुपारी दोन वाजता कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा आयोजित केला आहे. दी म्युनिसिपल युनियनच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा मोबदला पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ देण्यात यावा. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव दूर करावा. सर्व संवर्गांतील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत. डॉक्टरांच्या उपस्थितीविना नियमित लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात येणार आहेत. या मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. १२) दुपारी २.०० वाजता एफ/दक्षिण कार्यालय येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास होणाऱ्या सभेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, तरी सर्व सहायक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका भगिनींनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस रमाकांत बने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com