नीट परीक्षेपूर्वी तपासणीत विद्यार्थिनीशी गैरवर्तन

नीट परीक्षेपूर्वी तपासणीत विद्यार्थिनीशी गैरवर्तन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : नीट परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या तपासणीच्या वेळी विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. सांगलीमध्ये असा प्रकार झाल्याची तक्रार पालकांनी केली होती. त्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षक संचालकांना देण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
नीट परीक्षा संपूर्ण राज्यभरात अनेक केंद्रांवर घेण्यात आली. त्या त्या केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल, अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. कोणत्या अधिकाऱ्यांनी अशा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या? त्या कागदोपत्री देण्यात आल्या होत्या का? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश
वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. सांगलीतील घटना समाज माध्यमातून आमच्यापर्यंत आली. मात्र, आणखी कुठे अशी घटना घडली असेल तर त्याची तातडीने चौकशी करावी. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आल्याचेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com