mony
monysakal

Mumbai : अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने महिलेला गंडा

त्या वेळी महिलेने पुन्हा ४८ हजार रुपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतर सायबर चोराने मोबाईल फोन बंद करून टाकल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पनवेल - नर्सरीत मुलांचे अ‍ॅडमिशन घेण्याच्या बहाण्याने एका सायबर चोरट्याने पनवेलमधील नर्सरीचालक महिलेला एक लाखांचा गंडा घातला आहे. पनवेल शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार महिला पनवेल भागात लहान मुलांची नर्सरी चालवते. गेल्या महिन्यात या महिलेला मुलांचे अॅडमिशन घेण्याच्या बहाण्याने एका सायबर चोराने संपर्क साधला होता.

mony
Mumbai : सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडांची कत्तल; मुंबईकरांकडून मागवल्या हरकती सूचना

या वेळी समोरील व्यक्तीने त्याची पत्नी पनवेलमध्ये राहण्यास असून बॉर्डरवर कामाला असल्याचे सांगितले होते. तसेच मुलांची फी अ‍ॅडव्हॉन्समध्ये पाठवत असल्याचा बहाणा करून महिलेला यूपीआय आयडीवरून एक रुपया पाठवण्यास सांगितले.

त्यानुसार महिलेने एक रुपया पाठवल्यानंतर शाळेच्या फीची संपूर्ण रक्कम पाठविल्यास रक्कम डबल करून पाठविण्याचा बहाणा केला. त्या वेळी महिलेने पुन्हा ४८ हजार रुपये पाठवून दिले. मात्र, त्यानंतर सायबर चोराने मोबाईल फोन बंद करून टाकल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com