ठाण्यात २५०० नवे क्षयरोग रुग्ण

ठाण्यात २५०० नवे क्षयरोग रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : देशातून २०२५ पर्यंत क्षयरोग हद्दपार करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. क्षयरोग रुग्णांना शोधून त्यांना उत्तम उपचार आणि पोषक आहार मिळावा यासाठी क्षयरोग शोधमोहीम व जागरूकता निर्माण करण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे असले, तरी दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत मागील चार महिन्यांत अडीच हजार नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशात दर वर्षी लाखोंच्या संख्येने नवीन क्षयरुग्ण आढळून येत असतात. या रोगाचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने कडक धोरण अवलंबले आहे. प्रत्येक वर्षी अनेक रुग्णांचे क्षयरोगाचे निदान करण्याचे राहून जाते आणि त्यामुळे या रोगाचा सर्वत्र फैलाव होत असतो. क्षयरोगाला चाप लावण्यासाठी क्षयरोग शोधमोहीम व जागरूकता अभियान राबवले जात असते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील क्षयरोग रुग्णांची शोधमोहीम राबवण्यात येत असते. या मोहिमेअंतर्गत अर्धवट उपचार सोडणाऱ्या तसेच नव्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.

-----------------------
एक वर्षात आठ हजार रुग्ण
जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ८ हजार ६० रुग्ण आढळले. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराची लागण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तीन हजार ७१८ पुरुष रुग्णांची; तर चार हजार ३३८ महिला रुग्णांची संख्या असून तृतीय पंथीयांची संख्या चार इतकी आहे. ज्यामध्ये कमी प्रतिसाद देणाऱ्या टीबी रुग्णांची संख्या एक हजार २०० आहे आणि प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या सहा हजार ८६० आहे. अशा रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

---------------
रुग्णांनी घाबरू नये
रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव, सहव्याधी, म्हातारपण, शस्त्रक्रिया केलेले रुग्ण, खराब आहार, योग्य झोप न लागणे यामुळे टीबीचा संसर्ग होऊ शकतो. नागरिकांनी योग्य निदान करून लक्षणे जाणवल्यानंतर औषध घेतल्यास रुग्ण बरा होतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com