आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा

आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा

खारघर, ता. १३ (बातमीदार): आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन सोडतीत पात्र ठरलेल्या मात्र प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुदतवाढ देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांची तपासणी तसेच प्रवेश निश्चितीकरीता २२ मे पर्यंत मुदत वाढवल्याने पनवेल तालुक्यातील ३०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पालिका क्षेत्रात जवळपास ११० खासगी शाळा आहे. त्यातील शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल घटकांकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पनवेल परिसरात जवळपास चाळीस हजार पालकांनी अर्ज दाखल केले होते. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार २०० विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. तसेच शाळा प्रवेशासाठी उत्पन्न दाखले ३१ मार्च पूर्वीचे तसेच जातीचा दाखला, अशी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या आदेशानुसार दस्तावेज मिळवण्यासाठी उशीर झाल्यामुळे कामोठे, खारघर, तळोजा परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने ऑनलाईन सोडतीच्या प्रवेशासाठी २२ मे पर्यंतची अंतिम मुदत वाढवली आहे.
--------------------------------------------
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकांच्या समस्या एकूण तत्काळ पत्र व्यवहार केल्यामुळे पनवेलसह राज्यातील पालकांची समस्या दूर झाली आहे.
-किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------
ऑनलाईन सोडतीत मुलांचे नाव आले. पण एप्रिल महिन्यात काढलेल्या दस्तावेजामुळे प्रवेश नाकारले जात होते. मात्र, आता नवीन परिपत्रकामुळे मुलांना प्रवेश मिळणार आहे.
- नीलम कोल्हे, रहिवासी, खारघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com