अंबरनाथ नगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा

अंबरनाथ नगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा

अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेचा ६४ वा वर्धापनदिन नुकताच पालिकेच्या नूतन कार्यालयात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त नव्या प्रशासकीय इमारतीची सजावट करण्यात आली होती. तसेच सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्‍यांना आणि लोकप्रतिनिधींना प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती; तसेच रांगोळी काढण्यात आली होती. अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना १९५९ मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. आज पालिकेचे कामकाज नव्या प्रशासकीय इमारतीत गेल्याने या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये पालिकेचा वर्धापनदिनदेखील उत्साहात साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com