सावरकर नगरातही अनधिकृत इमले

सावरकर नगरातही अनधिकृत इमले

ठाणे, ता. १३ : ठाणे महापलिका हद्दीत दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आव वासून उभा ठाकला आहे. या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. अशातच या अनधिकृत बांधकांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. असे असताना, देखील कळवा, मुंब्रा, दिवापाठोपाठ सावरकर नगरमध्ये देखील अनधिकृतपणे इमारत उभी राहत असल्याची बाब समोर आली आहे. या इमारतीवर तीन वेळा कारवाई देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता येथील नागरीकांनीच या अनाधिकृत इमारतीत घरे घेऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. ठाणे महापलिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे इमले उभे राहत आहे. अशात ठाणे शहरातील सावरकर नगर भागाची देखील यात भर पडली आहे. सावरकर नगर भागात अवघ्या काही महिन्यांत सात मजली इमारत उभी राहिली असल्याचे दिसत आहे. त्यातही क्लस्टरच्या नावाखाली हे बांधकामे केले जात असल्याचा आरोपही येथील रहिवाशांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com