कळव्यात नालेसफाई रखडली

कळव्यात नालेसफाई रखडली

कळवा, ता. १५ (बातमीदार) : पूर्व भागातील शिवाजीनगर, शांतीनगर झोपडपट्टी परिसरातील नाले सध्या तुडुंब भरलेले आहेत. ठाण्यात महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. मात्र कळवा पूर्व मधील या भागात नालेसफाईला अजून मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे.
कळवा पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच शांतीनगर झोपडपट्टी व शिवाजीनगर परिसराचा भाग येतो मात्र या भागातील बहुतांश नाले पूर्ण भरले आहेत. नाल्यातील सांडपाण्यावर डासांची पैदास तयार होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच सध्या कडक उन्हाळा असल्याने या भरलेल्या नाल्यात तळाशी काळा कुजलेला दुर्गंधीयुक्त गाळ तयार झाला असल्याने त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली आहे. त्यामुळे येथील नाले लवकरात लवकर स्वच्छ करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
....
नाल्याच्या दुर्गंधीने आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच डासांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे नाले त्वरीत साफ करावे.
- अवनीप्रसाद मोर्य, स्थानिक रहिवासी, शांती नगर

कळवा पूर्वेतील नाले सफाईला सुरुवात झाली असून डोंगर पायथ्यापासून सुरुवात केली आहे. येथील एका नाल्यातून २० ते २२ डंपर घाण बाहेर काढण्यात आली आहे. लवकरच उर्वरीत नाले स्वच्छ करण्यात येतील.
- संजीव रणदिवे, उपस्वच्छता निरीक्षक, कळवा प्रभाग समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com