गुटखा विक्री करणारा तरुण अटकेत

गुटखा विक्री करणारा तरुण अटकेत

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : उलवे येथील उन्नती वसाहतीलगतच्या फुटपाथवर छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री करणाऱ्या तरुणाला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेशकुमार सोहनलाल मौर्या (वय २०) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला हजारो रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा व पान मसाला जप्त केला आहे. अंकुश शेलार व अंमलदारांचे पथक उलवे भागात गस्त घालत असताना उलवे सेक्टर-१९ ए मधील उन्नती वसाहतीलगतच्या फुटपाथवर एक तरुण छुप्या पद्धतीने प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना बामणडोंगरी बस स्टापसमोरील उन्नती वसाहतीजवळ सर्वेशकुमार हा तरुण संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळील पिशवीत हजारो रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्यांची पाकिटे आढळून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com