पाणीटंचाईच्या संकटाने करंजाडेवासी त्रस्त

पाणीटंचाईच्या संकटाने करंजाडेवासी त्रस्त

पनवेल, ता. १७ (बातमादार) : करंजाडे शहरातील रहिवाशांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने विकतचे पाणी घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. अशातच सिडकोने नव्या जलवाहिनीतून १ जुलै २०२३ नंतर पाणीपुरवठा होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे किमान एक महिनातरी पाणीटंचाईचे संकट करंजाडेतील रहिवाशांवर कायम आहे.
करंजाडे शहराला सध्या १६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे; पण शहरातील लोकसंख्येच्या मानाने हा पुरवठा कमी असल्याने अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थानिकांकडून सिडकोकडे अतिरिक्त पाणीपुरवठ्याची मागणी केली जात आहे. याबाबतची एक बैठकदेखील नुकतीच सिडको व एमजेपीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली होती. या वेळी शहराला नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे; पण यासाठी १ जुलैपर्यंत नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.
-----------------------------------
एमजेपीकडे ३५ एमएलडीची मागणी
सिडकोकडून करंजाडे, वडघर तसेच अन्य काही भागांसाठी ३५ एमएलडीची एमजेपीकडे मागणी करण्यात आली आहे. वडघरसह अनेक गावे अद्याप जुन्या जलवाहिनीवर आहेत. एमजेपी, सिडको तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यावर चर्चा करून नवीन जलवाहिनी देण्यात येणार आहे; पण या कामासाठी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी जलवाहिनी सुरू झाल्यानंतरच पाणीप्रश्न निकाली निघेल, असे सिडको अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com