कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांचा पोबारा

कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांचा पोबारा

खारघर, ता. १६ (बातमीदार) : पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच व्यवसायासाठी उभारलेल्या बेकायदा शेड जमीनदोस्त करण्याचा प्रकार तळोजामध्ये घडला आहे. अधिकाऱ्यांची फेरीवाल्यांबरोबरील साट्यालोट्यांमुळे कारवाईचा हा देखावा केल्याची चर्चा तळोजा परिसरात रंगली आहे.
तळोजा वसाहतीमधील सेक्टर १० आणि ११ मधील मुख्य रस्ता आणि नानासाहेब धर्माधिकारी पुलाकडून तळोजा पाचनंद मार्गे महावितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते, पदपथांवर दिवसरात्र फेरीवाले व्यवसाय करतात. असाच काहीसा प्रकार हा तळोजा प्रवेशद्वार आणि सेक्टर दहा पोलिस चौकालगत असलेल्या रस्त्याचा दोन्ही बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावरही आहे. अशातच सोमवारी (ता.१५) सायंकाळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होणार असल्याचे फेरीवाल्यांना समजल्याने व्यवसायासाठी उभारलेले शेड जमीनदोस्त करून फेरीवाल्यांनी पोबारा केल्याचा प्रकार समोर आली आहे. त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या अतिक्रमण पथकाला माघारी फिरावे लागले होते. याविषयी स्थानिकांकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांच्या फेरीवाल्यांबरोबरील साट्यालोट्यांमुळे कारवाईचा हा देखावा केला जात असल्याचे सांगितले. याविषयी प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
-----------------------------
दादामंडळी फेरीवाल्यांच्या पाठीशी
तळोजा परिसरातील अतिक्रमणांवर पालिकेकडून कधीतरीच कारवाई होत असल्याने फेरीवाल्यांनी बेकायदा व्यवसाय थाटले आहेत. अशातच या परिसरात व्यवसाय करणारा फेरीवाल्यांकडून काही दादा मंडळी व्यवसायानुसार मासिक पाचशे ते हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या कारवाईची माहिती दादा मंडळी फेरीवाल्यांना देतात. त्यामुळे विक्रीसाठीचे साहित्य वाचवण्यासाठी पैसे दिले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com