मारहाणप्रकरणी तृतीयपंथींसह सहा जणांविरोधात गुन्हा

मारहाणप्रकरणी तृतीयपंथींसह सहा जणांविरोधात गुन्हा

मुंबई, ता. १६ : माटुंगा येथे आईस्क्रीम पार्लरमध्ये गोंधळ घालणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तृतीयपंथींसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माटुंगा पूर्व परिसरातील महेश्वरी उद्यान येथील ‘जस्ट इन सेव्हन’ आईस्क्रीम पार्लरमध्ये रविवारी (ता. १४) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली होती. आरोपी ‘जस्ट इन सेव्हन’ या दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानाचे मालक जमशेद इराणी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या बाहेरील मातीच्या कुंड्या व दुकानाच्या जाहिरात फलकाची तोडफोड केली. यावेळी आरोपींमधील दोन तृतीयपंथींनी अंगावरचे कपडे काढून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने पोलिस विजय वाडीले यांच्या हाताला चावा घेतला. वाडिले यांचे सहकारी हवालदार साळुंखे यांच्या हातालाही दुखापत झाली. याप्रकरणी अमन मिश्रा, मलिका खान, नूर पाटील, सूरज साखरे, प्रिया शेख, दुर्गा राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com