कुंरुदच्या उपसरपंचपदी जान्हवी पाटील

कुंरुदच्या उपसरपंचपदी जान्हवी पाटील

पडघा, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंरूद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जान्हवी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच भाई पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. त्यानुसार सरपंच दीपाली केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक खास सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी जान्हवी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी मावळते उपसरपंच भाई पाटील, सदस्य योगेश पाटील, श्रीकांत गायकर, संदीप काठोळे, निकीता जाधव, रेश्मा वाघे, विशाखा भोईर, सुनील मोरे, भावना सांबरे उपस्थित होते.
....
पडघा : नवनियुक्त उपसरपंच जान्हवी पाटील यांचे ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com