जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : एप्रिल, मे महिन्यात विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कमर्चाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या १८ व १९ मे रोजी पार पडणार आहेत. ही प्रक्रिया ठाण्यातील मो. ह. विद्यालयात पार पडणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय, तर ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या विनंत्या बदल्या करण्यात येत असतात. २०१४ च्या शासन निर्णयानुसार या बदल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह बांधकाम, अर्थ विभाग, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभाग आदी नऊ विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. बुधवारी होणाऱ्या या बदल्यांचे नियोजन एक दिवस उशिरा म्हणजे १८ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांमधून या बदल्या होत आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सभागृहात उपस्थित राहवे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com