ठाण्यात सट्टेबाजांवर कारवाई

ठाण्यात सट्टेबाजांवर कारवाई

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) ः आयपीएलच्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या चार जणांवर वर्तकनगर पोलिसांनी छापेमारी करीत मंगळवारी कारवाई केली. सट्टेबाजीप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. वर्तकनगर पोलिसांनी अटक केलेला आरोपी मुलुंडचा रहिवासी आहे. ३२ वर्षीय राजा नवीन अडवा याला ठाण्यातील सावरकरनगर भागातील हॉटेलमधून वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. हा आरोपी तीन आयडीसह ९५ हजारांवर खेळत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिताफीने सापळा रचून आरोपी राजा नवीनचंद याला अटक केली. त्यानंतर अन्य तीन आरोपींनाही अटक केल. हिमांशू मुकुंदराव अजमेर, विकी मुकुंदराव अजमेर आणि महेश देवीलाल पटेल अशी त्यांची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com