हुक्का पार्लरवर तिसऱयांदा कारवाई

हुक्का पार्लरवर तिसऱयांदा कारवाई

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : एपीएमसीतील पामबीच गॅलेरिया मॉलमधील कबाना कॅफेमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी हुक्का पार्लर चालक व वेटर असे पाच जण, तसेच हुक्का ओढण्यासाठी बसलेले ३५ तरुण-तरुणी अशा ४० लोकांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे कबाना कॅफेमध्ये सुरू असलेल्या या हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी मागील दोन महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई केली आहे. त्यानंतर देखील हे हुक्का पार्लर पहाटे ३ वाजेपर्यंत बिनधास्तपणे सुरू ठेवण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पाम बीच गॅलेरिया मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील कबाना कॅफेवर छापा मारला. या वेळी हुक्का पार्लरमध्ये हुक्का फ्लेवरचा गंध दरवळत असल्याचे व संपूर्ण कबाना कॅफेमध्ये धूर पसरल्याचे आढळून आले. तसेच पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी हुक्का ओढत बसल्याचे तसेच कबाना कॅफेमधील वेटर त्यांना तंबाखूयुक्त हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर पुरवताना आढळून आले. या वेळी पोलिसांनी पार्लर चालक, वेटर व तरुण-तरुणी अशा ४० जणांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com