मिरा-भाईंदरमध्ये ‘समर वंडरलँड’ची धूम

मिरा-भाईंदरमध्ये ‘समर वंडरलँड’ची धूम

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : लहान मुलांसाठी मिरा-भाईंदर शहरात ‘समर वंडरलँड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शाळेला सुटी असल्याने मुलांचा वेळ आनंदात जावा, त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळावा, यासाठी युवा नेते पूर्वेश सरनाईक यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. आज (ता. १८) आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ‘समर वंडरलँड’चे उद्‍घाटन करण्यात आले. मिरा रोडच्या रामदेव पार्क भागातील सेव्हन इलेव्हन शाळेजवळील मैदानात १८ ते २१ मे दरम्यान हा महोत्सव होत असून सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत मोफत प्रवेश असणार आहे.

लहान मुलांना विरंगुळा, खेळ आणि त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी एखादे व्यासपीठ मिळावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या चारही दिवस लाईव्ह म्युझिक, फूड स्टॉल, गेम झोन, विविध कार्यशाळा आणि खरेदीसाठी शॉपिंग विभाग आहे. चार दिवसांत ५० हजार नागरिक या महोत्सवाला आपल्या कुटुंबासह भेट देतील, असा अंदाज आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भेट देणार आहेत, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com