मेट्रो तीन मार्गावरील ट्रॅक उभारणीला गती

मेट्रो तीन मार्गावरील ट्रॅक उभारणीला गती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भूमिगत मेट्रो ३ मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनचा प्रयत्न आहे. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील कामांना वेग आला आहे.
फेज १ मधील आरे ते बीकेसी या मार्गावरील ट्रॅक उभारणीत पॅकेज पाच अंतर्गत ७६ टक्के; पॅकेज सहा अंतर्गत ७५ टक्के; तर पॅकेज सातचे १०० टक्के ट्रॅक उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. एकूण मार्गात पॅकेज पाचमध्ये ७.६ किमीच्या ट्रॅकचा समावेश आहे. त्यापैकी ५.७ किमीच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे; तर पॅकेज सहामध्ये येणाऱ्या एकूण ८.३९ किमीपैकी ६.२९ किमीचे काम पूर्ण झाले आहे. पॅकेज सातमध्ये ८.५३ किमी मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर ट्रॅक उभारणी पूर्ण झाली आहे. मेट्रो तीनमार्गावरील ट्रॅक उभारणी जलद गतीने होत आहे. संपूर्ण मार्गावरील ६० टक्के कामे डेपो वगळून आधीच झाली आहेत; तर उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती एमएमआरसीएलने दिली आहे.

कुलाबा - आरे टप्पा दृष्‍टिपथात
कुलाबा ते आरे या ३३ किमी अंतरावर भूमिगत मेट्रो ३ धावणार आहे. दोन टप्प्यात या भूमिगत मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुलाबा अशा दोन टप्प्यात ही कामे केली जाणार आहेत. यामध्ये आरे ते बीकेसी दरम्यान फेज १चे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे; तर एकूण स्टेशनचे बांधकाम सुमारे ९३ टक्के पूर्ण झाले आहे. आरे ते बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत आणि बीकेसी आणि कफ परेड दरम्यानचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com