पोटनिवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याचा दावा

पोटनिवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याचा दावा

डहाणू, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील नऊ प्रभागांतील रिक्त जागांसाठी गुरुवारी (ता. १८) मतदान घेण्यात आले. डहाणूतील सेंट मेरीज हायस्कूलमध्ये शुक्रवारी (ता. १९) मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीत निवडून आलेल्या सर्व महिला उमेदवार या अनुसूचित जमातीच्या आहेत. ही निवडणूक कोणत्याही पक्ष चिन्हावर लढवण्यात आली नसली तरी भाजपने आठ उमेदवार निवडून आल्याचा दावा डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी केला आहे.

भूमिका भुवनेश गोलिम (आसनगाव ग्रामपंचायत), तेजस्विनी तारेश उंबरसाडा (कैनाड), निर्मला कमलेश वाघात (चरीकोटबी ग्रामपंचायत), संगीता वसंत गोरवाला (जामशेत), प्रतिभा विष्णू बसवत (दह्याळे), सोनाली दिनकर सापटा (मुरबाड), जयश्री प्रकाश चव्हाण (ग्रामपंचायत निकणे, प्रभाग दोन), सुंदर रमेश रसाळ (ग्रामपंचायत निकणे, प्रभाग तीन), कल्पना संपत दांडेकर (हळद पाडा) हे उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित देशमुख यांनी घोषित केले.

दह्याळे ग्रामपंचायतीतील उमेदवार प्रतिभा विष्णू बसवत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अमिता जयदेव रावते यांना प्रत्येकी ८३ मते पडली होती. त्यामुळे लॉटरी पद्धतीने चिठ्ठी टाकल्यानंतर प्रतिभा विष्णू बसवत यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com