डी मार्टमध्ये पालिकेचे ‘रिसायकल मार्ट’

डी मार्टमध्ये पालिकेचे ‘रिसायकल मार्ट’

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन मार्फत राबवण्यात येत असणाऱ्या ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ या उपक्रमाला नवी मुंबईत सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत ‘थ्री आर’ संकल्पनेतून सीबीडी-बेलापूरमधील डी मार्टमध्ये सुरुवात केली आहे.
सुक्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘थ्री आर’ ची संकल्पना अत्यंत मोलाची असून त्याकरिता डी मार्टसारख्या लोकप्रिय वाणिज्य आस्थापनेने नवी मुंबई महापालिकेची ‘रिसायकल मार्ट’ संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारचा बहुपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम देशात बहुधा पहिल्यांदाच राबवला जात आहे. यामध्ये पर्यावरण जपणुकीसाठी हातभार आणि पॉईंट्सच्या रूपाने पैशांची बचत अशा दोन्ही बाजूने हा उपक्रम नागरिकांसाठी फायद्याचा असल्याने याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतील, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त केला जात आहे.
------------------------------------
‘रिसायकल मार्ट’ म्हणजे काय ?
-‘रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना असून ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू डी मार्टमध्ये आणून दिल्यास या वस्तूंवर पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत.
- पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रकमेची सूट त्यांनी डी मार्टमध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. घरातील सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे. शिवाय नागरिकांना आर्थिक लाभही होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com