सराईत मंगळसूत्र चोरटा अटकेत

सराईत मंगळसूत्र चोरटा अटकेत

नालासोपारा, ता. २२ (बातमीदार) : वयोवृद्ध महिलांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून फरारी होणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष २ ला यश आले आहे. या चोरट्याकडून एक मोटारसायकल जप्त केली. त्याचा अधिक तपास केला असता त्याने अर्नाळा, तुलिंज, विरार पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली. तो सराईत आरोपी असून त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शाहीद अब्दुल सत्तार कापडिया (वय ३३) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव असून त्याचा एक साथीदार फरारी आहे. हा वापी, गुजरातचा राहणारा आहे. २९ एप्रिल रोजी विरार पश्चिममधील गोकुळ टाऊनशिपमधील ८० वर्षांच्या गंगाबाई यशवंत गोरीवले या सोसायटीच्या परिसरात बसल्या असताना दोन मोटारसायकलवरून २० ते २२ वर्षांच्या वयोगटातील तरुण आले होते. एका मोटारसायकलवरील एक तरुण वयोवृद्ध महिलेजवळ आला. काहीवेळ त्याच ठिकाणी घुटमळत राहून त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून फरारी झाला होता. परिसरातील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पसार झाला होता. ही घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. गुन्हे शाखा कक्ष २ विरारचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलिस हवालदार अशोक पाटील या पथकाने सीसी टीव्ही, मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्‍लेषण करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com