मुंब्र्यात दोन घरांना आग

मुंब्र्यात दोन घरांना आग

कळवा, ता. २२ (बातमीदार) : मुंब्र्यातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (ता. २२) दुपारी एकच्या सुमारास टाटा पॉवरच्या केबमुळे दोन घरांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच आगीत एका कुटुंबातील चार जण भाजले असून त्यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंब्र्यातील शिवाजीनगर परिसरात झगडे चाळ या झोपडपट्टीच्या वरून टाटा पॉवरची वाहिनी गेली आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास झोपडीच्या छताला या तारांचा स्पर्श होऊन त्यातील दोन घरांना आग लागली. आगीत झोपडीत राहणाऱ्या बादशहा नसीरुद्दीन इस्लाम व फरीदा मुस्ताक कुरेशी यांच्या घरातील पलंग, लाकडी कपाट, स्वयंपाकाची शेगडी, भांडी, कपडे व संगणक जळून खाक झाले; तर अल्लाउद्दीन सय्यद (वय ३०), सलमा सय्यद (वय ३०), फातिमा सैयद (वय ४) व अलिना सैयद (वय ५) हे भाजून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी कुटुंब येथे भाड्याने राहत होते. आगीचे वृत्त समजताच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व टोरंट वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com