कोपरीत २०० अंध कलाकारांनी आळवले बुद्ध-भीम गीतांचे सूर!

कोपरीत २०० अंध कलाकारांनी आळवले बुद्ध-भीम गीतांचे सूर!

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : राज्यभरातील २०० अंध कलाकारांकडून कोपरीत प्रसिद्ध बुद्ध-भीम गीतांबरोबरच लोकगीतांचे सूर आळवले गेले. भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
तारा माऊली सामाजिक सेवा संस्था व दी बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ ब्लाइंड, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून कोपरी येथे बुद्ध-भीमगीत गायन स्पर्धा रविवारी सायंकाळी भरवण्यात आली होती. या स्पर्धेला राज्याच्या विविध भागातून सुमारे २०० अंध कलाकार उपस्थित होते. भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रसिद्ध गीते कलाकारांनी सादर केली. अंध कलाकारांच्या उत्तमोत्तम स्वरात ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. आमदार संजय केळकर आणि भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
जाहली पहाट, आज वैशाखी पौर्णिमा, बुद्ध वंदना करू, कायदा भीमाचा, लाल दिव्यांच्या गाडीला, जय भीम वाल्यांचा सरदार, बना स्वाभिमानी, माझ्या भीमाने, चौदावे रत्न भीमराव आदी गीते गायकांनी खड्या आवाजात सादर केल्याने वातावरण भारून गेले होते. या कार्यक्रमाला तारा माऊली संस्थेचे संस्थापक व माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, भावना चव्हाण, तारा माऊली संस्थेचे संस्थापक व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com