गांजा विक्रि करणाऱ्या त्रिकुटाला अटक

गांजा विक्रि करणाऱ्या त्रिकुटाला अटक

नालासोपारा, ता. २२ (बातमीदार) : ओरिसा राज्यातून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात विक्री करण्यासाठी आणलेल्या गांजा टोळीचा मिरारोडच्या काशिमीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तीन जणांना मुद्देमालासह रंगेहात अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार लाख २० हजार रुपये किंमतीचा ४२ किलो गांजा जप्त करून, अटक तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीमिरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाही केली आहे.
अभिषेक देविदास वाघ (वय २५), अभिषेक जसवंत सिंग (वय २०) व कुलदीप गुरणाम सिंग (वय २५) अशी अटक आरोपींची नावे असून, हे दहिसर, नायगावचे राहणारे आहेत. १८ मे रोजी तीन संशयित आरोपींची टोळी मोठ्याप्रमाणात ओरिसा राज्यातून गांजा काशीमिरा पोलिस ठाणे हद्दीत विक्रिसाठी आणणार असल्याची माहिती काशीमिराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांना मिळाली होती. त्यांनी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त जयवंत बजबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमिरा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक कुमारगौरव धादवड, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून घोडबंदर गावाच्या जुना टोल नाक्याजवळ तैनात केले होते.

-----------------
रिक्षात ४२ किलो गांजा
एका रिक्षात तीन संशयित आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन रिक्षाची झडती घेतली असता प्लास्टिकच्या गोणीत चार लाख २० हजार रुपये किमतीचा ४२ किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी तात्काळ रिक्षा व गांजा असा चार लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. काशीमिरा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मिरारोड, भाईंदर, वसई, नालासोपारा, विरारसह पालघर, ठाणे, मुंबई परिसरात विक्रि होणाऱ्या गांजावर लगाम लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com