लग्नाच्या हळदीत दोन गटात हाणामारी

लग्नाच्या हळदीत दोन गटात हाणामारी

भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : लग्नानिमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील अंजूरफाटा येथील साठेनगरमध्ये घडली. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन जाधव (वय २१), कैलास धोत्रे (वय ३५), दिनेश मोरे (वय १८), संदीप उदमेले उर्फ डुबऱ्या (वय २४), राजू गुंजाळ (सर्व रा. साठेनगर), संजय जाधव, अक्षय जाधव (दोघे रा. फेणेगाव, कामतघर) अशी परस्परविरोधी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. तसेच संजय जाधव, अक्षय जाधव, दिनेश मोरे व अजय चव्हाण अशी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या वेळी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड, फरशीने दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. यातील चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक तडवी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com