महाराष्ट्रात ६९ रेल्वे स्थानकांवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट

महाराष्ट्रात ६९ रेल्वे स्थानकांवर वन स्टेशन वन प्रॉडक्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : भारत सरकारच्या ''वोकल फॉर लोकल'' व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेवर ''वन स्टेशन वन प्रॉडक्ट'' (ओएसओपी) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १५ मे २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील ६९ रेल्वे स्थानकांवर ७२ ओएसओपी आउटलेटस कार्यान्वित करण्यात आली आहेत.
या ओएसओपी केंद्रांची एक-समान रचना नॅशनल डिझाइन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्या त्या प्रदेशातील आदिवासी जमातींनी बनवलेल्या कलाकृती, स्थानिक वीणकरांनी बनवलेली हातमाग वस्त्रे, लाकडावरील जगप्रसिद्ध कोरीवकाम, चिकनकारी आणि जरी-जरदोजी यासारखे कपड्यावरील कलाकुसरीचे काम अथवा त्या प्रदेशात उत्पादन होत असलेले मसाले पदार्थ, चहा, कॉफी आणि इतर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, उत्पादने यांचा यात समावेश आहे.
...
कोठे काय मिळणार?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे चामड्याची उत्पादने, घरोघरी उपयोगी अगरबत्ती, धूप, साबण, चिंचवड येथे फिनाइल, चर्चगेट येथे चामड्याची उत्पादने यांचा समावेश आहे. गोरेगाव येथे खादी उत्पादने, इगतपुरी येथील पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणची, पापड इत्यादी हंगामी फळे व खाद्यपदार्थ, कोल्हापूर येथे हाताने तयार केलेली कोल्हापुरी चप्पल, कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी, लोणावळा येथे चिक्की व फज उत्पादने, नाशिक रोड येथे पैठणी साड्या, पंढरपूर येथे विठ्ठल मूर्ती, कुमकुम, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य, नागपूर येथे बांबू उत्पादने, परळ येथे कापड आणि हातमाग, पिंपरी येथे हाताने बनवलेल्या पिशव्या, सातारा येथे कंदी पेढा, शेगाव येथे पापड, सोलापूर येथे सोलापुरी बेडशीट्स आणि टॉवेल, वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला, वसई रोड आणि नालासोपारा येथे सॉफ्ट खेळणी उपलब्ध असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com