एसटीच्या ताफ्यात १० हिरकणी बस

एसटीच्या ताफ्यात १० हिरकणी बस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : नवीन रंगसंगतीच्या १० हिरकणी बस आज एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या. प्रवाशांना साध्या गाडीपेक्षा जलद आणि परवडणाऱ्या दरात निमआराम हिरकणी बसची सेवा घेता येणार असून या नव्या बस मंगळवारपासून सेवेत येतील.
खासगी गाड्यांना टक्कर देण्यासाठी आरामदायी आसने आणि वेगाने प्रवास पूर्ण करण्यासाठी दमदार इंजिनाचा समावेश हिरकणीत आहे. दापोडीस्थित एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत हिरकणीची बांधणी सुरू आहे. एकूण २०० हिरकणी बांधण्यात येणार आहेत. रायगड विभागातील रोहा आणि मुरूड आगारांत या बसेस धावणार आहेत. निमआराम श्रेणीप्रमाणेच तिकीट भाडे आकारण्यात येणार असून यात कोणताही बदल नाही. बस आकर्षक दिसावी म्हणून आतील बाजूस थर्मोप्लास्टिक शीट लावण्यात आली आहे.
...
अशा सुविधा
रस्त्यांवरील गतिरोधक, खड्डे यावरून धावताना प्रवाशांना झटका बसू नये, यासाठी एअर सस्पेंशनसह आरामदायक आसने गाडीत आहेत. बसचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुढील बाजूस चालकासमोर तयार डॅशबोर्ड बसविण्यात आले आहेत. बसची देखभाल-दुरुस्ती सुलभ व्हावी यासाठी बसच्या फ्लोअरवर हॅण्डल सुविधा देण्यात आली आहे. बॅटरी बॉक्स, प्रवाशी सामान कक्ष, राखीव टायर (स्पेअर व्हील बॅकेट) इत्यादींच्या सुलभ हाताळणीसाठी बसच्या बाजूला व्यवस्था आहे. धुळीपासून संरक्षण होण्यासाठी लॉक कव्हर बसविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com