भिवंडीतून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

भिवंडीतून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : शहरातील विविध भागांतून दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही मुले १३ ते १५ वयोगटातील असून पोलिसांनी तिन्ही मुलांच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
भिवंडी शहरातील गैबीनगर भागातील इक्बाल बिल्डिंगमध्ये राहणारा नुमान अन्सारी (१४) हा २० मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास दुकानात गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचा शोध घेऊनही न सापडल्याने मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत चौहान कॉलनीतील केजीएन चौकाजवळील सभागृह भागात राहणारा इम्रान कुरेशी (१४) हा १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. तो परत आला नाही. त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला आहे. त्याचप्रमाणे दिवाणशहा दर्गाजवळील चमन चाळीत राहणारा जुम्मन उर्फ शबान खान (१५) हा १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो न सापडल्याने भोईवाडा पोलिसांनी त्याच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com