बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

नवी मुंबई (वार्ताहर): उरणमधील जसखार गावातील सिडकोचा साडेबारा टक्के योजनेअंतर्गत असलेला भूखंड परस्पर हडप करण्यासाठी बनावट रहिवासी दाखले दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दोन मृत व्यक्तींना जिवंत दाखवून त्यांनीच जेएनपीटीमध्ये कागदपत्रे सादर केल्याचे भासवले गेले आहे. त्यामुळे न्हावा-शेवा पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जसखार येथील धनंजय आत्माराम ठाकूर यांची जमीन जेएनपीटी प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आली होती. त्यापोटी धनंजय ठाकूर यांना साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंडाचे वितरण होणार होते. कोट्यवधी रुपये किमतीचा हा भूखंड परस्पर हडप करण्यासाठी धनंजय ठाकूर यांचे छोटे भाऊ विजय ठाकूर यांनी जसखार गावचे ग्रामसेवकाला हाताशी धरून एकूण सहा जणांचे बनावट रहिवासी दाखले बनवून घेतले होते. तसेच मृत व्यक्तीच्या खोट्या सह्या मारून जेएनपीटी मार्फत सिडकोमध्ये साडेबारा टक्के योजनेचा भूखंड मिळण्यासाठी फाईल सादर केली आहे. हा प्रकार धनंजय आत्माराम ठाकूर यांचे मुळ वारसदार शिरीष ठाकूर यांच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांसह दहा जणांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com