लोहोपे तलावातील पाणी वळवण्यास विरोध

लोहोपे तलावातील पाणी वळवण्यास विरोध

वाडा, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील लोहोपे येथील तलावात मुबलक पाणीसाठा आहे. या तलावातून नजीकच्या चिंचघर आणि मुसारणे या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत जलकुंभ उभारला जाणार आहे; मात्र तलावातील पाणी अन्य गावांना देण्यास लोहोपे गावातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच आंदोलन करण्याचा इशाराही पाटबंधारे विभाग व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

लोहोपे गाव परिसरात पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी एक विस्तीर्ण तलाव बांधला आहे. या तलावात मुबलक पाणीसाठा आहे. या पाण्यामुळे स्थानिक शेतकरी भातशेती, भाजीपाल्यासह वीटव्यवसाय, मत्स्यव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तसेच केळठण, गोराड, निंबवली या गावांसाठी जलसिंचन योजना केली आहे. असे असतानाच चिंचघर, मुसारणे या ग्रामपंचायतींना या तलावातून पिण्यासाठी पाणी मंजूर झाले आहेत. त्यासाठी या तलावातून पाणी वळवण्यात येणार आहे. या दोन ग्रामपंचायतींना पाणी दिल्यास भविष्यात टंचाई जाणवणार असून येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी हे पाणी उचलण्यास तीव्र विरोध केला आहे. लोहोपे नागरिकांनी ग्रामसभेतसुद्धा अन्य ग्रामपंचायतींना पाणी न देण्याचा ठराव घेण्यात आला आहे.


तलावातून पाणी उचलण्यास नागरिकांचा विरोध असल्याने त्याबाबतचा पत्रव्यवहार पाटबंधारे विभाग व तहसीलदार यांना केला आहे. याबाबतचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- आदेश पाटील,
शेतकरी, लोहोपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com