‘त्या’ नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

‘त्या’ नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

ठाणे, ता. २३ : कळव्यातील नऊवर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयित आरोपी सिद्दिकी शेख याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांना चार दिवसांपूर्वी केली होती. अखेर संशयित आरोपी शेख याला पोलिसांनी गजाआड करत त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या आईने संशयित आरोपी सिद्दिकी शेख याच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र घडलेला प्रकार गंभीर असल्यामुळे या नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेचे सरचिटणीस पाचंगे यांनी पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांना निवेदनाद्वारे केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com