बाजारात पापड, कुरडयांना मागणी

बाजारात पापड, कुरडयांना मागणी

डोंबिवली, ता. २९ (बातमीदार) : पावसाळ्यासाठी पापड शेवया कुरड्या लोणचे असे विविध पदार्थ बनवून ठेवले जातात. पण नोकरी करणाऱ्या किंवा ज्यांना स्वत: पापड, शेवया, कुरड्या बनवणे शक्य नाही, अशा महिला तयार वस्तु विकत घेतात. त्यामुळे हे पदार्थ बनवून विकणाऱ्या महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. पण मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका या उद्योगाला ही बसला आहे. परिणामी पापड, कुरड्या आणि शेवयांच्या दरात वाढ झाली आहे.
उन्हाळ्यामध्ये पापड, कुरड्या असे तयार केलेले हे पदार्थ बराच काळ टिकून राहतात. विविध प्रकारचे पापड, शेवया व कुरडया बनवून ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या महिलांना या गृहउद्योगाने आर्थिक सक्षम बनवले आहे. शहराच्या विविध भागात पसरलेल्या अशा गृहउद्योगांनी सुमारे १२ ते १५ हजार महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना मनाप्रमाणे वाळवणीचे पदार्थ मिळत असल्याने या पदार्थांना दिवसेंदिवस मागणीही वाढत आहे. पण यंदा मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पाहिजे त्या प्रमाणात वळवण बनविता आले नाही. त्यामुळे या पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे.
...
असे आहेत दर (प्रतिकिलो)
तांदळाचे पापड ३६०
उडदाचे पापड ३४०
नाचणीचे पापड ३००
ज्वारी पापड ३००
रव्याच्या कुरड्या २५०
तांदळाच्या कुरड्या २५०
गव्हाच्या कुरड्या २८०
मिरगुंडे २४०
बटाट्याचे वेफर्स ४००
साबुदाणा बटाटा चकली ३७०
सांडगे २५०
सुकी मिरची १६०
सुकी दही मिरची २००
....
आमच्याकडे विविध प्रकारच्या वस्तु बनवून मिळतात. त्यामुळे महिलांची आमच्याकडे गर्दी वाढत आहे. घरगुती पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या कुरड्या, नागली पापड, तांदळाचे पापड, बटाटा पापड, वडे, वेफर्स, चकली, शेवया आदी वस्तूंना होलसेल दरात मागणी असते.
- वैशाली घरत, एकवीरा गृह उद्योग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com