कबुतरांमुळे वाढता न्युमोनिया

कबुतरांमुळे वाढता न्युमोनिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : कबुतरांची समस्या केवळ मुंबई-नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रापुरती नसून, जगभरात त्यांचा उपद्रव आढळून येत आहे. स्वित्झर्लंड येथील बसेल युनिव्हसिर्टीने ''कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम'' याबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार, कबुतरांच्या विष्ठेत नऊ प्रकारचे जिवाणू, पाच प्रकारचे विषाणू आणि परजीवी आढळून येतात. यातील, दहापेक्षा कमी घटक माणसांमध्ये संसर्ग पसरवू शकतात.
निरोगी सदृढ माणसाला कबुतरांमुळे फारसा धोका नाही. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असलेले, गंभीर आजार झालेल्यांना संसर्ग होऊन श्वसनाशी निगडीत आजार होण्याची शक्यता अधिक आहे. पक्षी पर्यावरणासाठी पूरक मानले जात असले, तरीही कबुतरांची संख्या वाढणे मानवी आरोग्यास धोकादायक ठरते, असा निष्कर्ष पिंपरी चिंचवड येथील कबुतरांवर अभ्यास करणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाने गेल्या वर्षीच दिला होता. सद्यस्थितीत इमारतीची मोकळी जागा, बाल्कनी, उंच इमारतीचे टेरेस, पाण्याच्या टाकीजवळील आडोसा, पॅराफिट भिंती, खिडक्‍यांवर, एसीच्या बॉक्‍सवर कबुतरांची वस्ती वाढत आहे.
..................................
कबुतरांच्या पंखातून निघणाऱ्या फिदर डस्टमुळे अती संवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्‍यता असते. धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून दीडशेहून अधिक प्रकारच्या ॲलर्जी मानवी शरीरात होतात. यातून दमा, सतत सर्दी खोकल्याचा त्रास होतो. लहान मुले, गर्भवती महिला; तसेच ज्येष्ठ नागरिक यांची प्रतिकार शक्ती कमी असते. अशामध्ये कबुतरांची विष्टा संपर्कात आल्यास ऍलर्जीचे प्रमाण वाढते.
- डॉ.पार्थिव शहा, फुफ्फुसविकार तज्‍ज्ञ, अपेक्स रुग्णालय समूह

काय सांगतो अहवाल?
कबुतरांच्या संसर्गामुळे मुंबई आणि परिसरात न्यूमोनिया आणि फुफ्फुसांचे आजार बळावत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, २०१९ मध्ये हैद्राबाद पालिका प्रशासनाने लोकांना कबुतरांना अन्न देऊ नका, असे आवाहन केले होते. भारतात अंदाजे ३४.३ दशलक्ष दम्याचे रुग्ण आहेत. तसेच, जगात दरवर्षी ४. ६१ लाख लोक अस्थमामुळे मरतात आणि भारतात १.९८ लाख मृत्यू होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com