मटका जुगारींना आमदारांनी रंगेहात पकडले

मटका जुगारींना आमदारांनी रंगेहात पकडले

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे नाले सफाईकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार नागरिकांनी केल्याने भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांसह नालेसफाईचा पाहणी दौरा केला. या दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भारत कंपाऊंड भागातील नालेसफाई पाहणी करीत असताना आमदार शेख यांना तेथे मटका जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनास्थळी बोलावून जुगार चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले. शांतीनगर भागातील जुगारमाफिया अहमद अली उस्मान कारभारी (५२, रा. तोफानाका, भिवंडी), निहाल अहमद अब्दुल मजीद मोमीन (५९ रा. शांतीनगर, भिवंडी) व अबू सत्तार फतेअहमद शेख (६०, रा. नवीवस्ती, भिवंडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जुगार मटक्याच्या अड्ड्यातून जुगाराचे साहित्य आणि तीन हजार ५५० रुपये रोख जप्त केले. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात जुगारमाफियांवर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com