वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात आणि या महिन्यात तुलनेने प्रचंड तफावत

वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात आणि या महिन्यात तुलनेने प्रचंड तफावत

इन्फ्लुएंझाच्या रुग्णांमध्ये घट
वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत मेमध्ये प्रचंड तफावत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यातील इन्फ्लुएंझा आणि एच३एन२च्या रुग्णसंख्येत तीव्र घट झाल्‍याचे दिसून आले आहे. या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत आणि मे महिन्यात तुलनेने प्रचंड तफावत जाणवत आहे. दरम्यान, या पाच महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लू आणि एच३एन२चे हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एका महिन्यात स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांची संख्या ३१ टक्क्यांनी आणि एच३एन२ रुग्णांची संख्या ६२ टक्क्यांनी कमी झाली असली, तरी राज्यभरात रुग्णांची नोंद होत आहे; पण नवीन रुग्णांमध्ये घट झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कोविड-१९ संसर्ग आणि इतर विषाणूजन्य संसर्ग या वर्षाच्या सुरुवातीला कमी झाले आहेत. राज्यात २०२३ च्या पहिल्या पाच महिन्यांत स्वाइन फ्लूचे ५९० आणि एच३एन२चे ५०० रुग्ण आढळले. राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान संपूर्ण राज्यात इन्फ्लूएंझा ए ची असंख्य प्रकरणे आढळून आली. त्यात परिणामी मृत्यू झाले आहेत. एच३एन२ मुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही जास्त होते; परंतु आता सक्रिय रुग्णांसह मे महिन्यात रुग्‍णसंख्या कमी झाली आहे.
..................................
रुग्णसंख्या आकडेवारी
कालावधी आजार रुग्‍ण
२३ मार्च ते २३ एप्रिल स्वाइन फ्लू ९८
२३ एप्रिल ते २३ मे स्वाइन फ्लू ६७
२३ मार्च ते २३ एप्रिल एच३एन२ १७१
२३ एप्रिल ते २३ मे एच३एन२ ६५

गेल्या दोन आठवड्यांत इन्फ्लुएंझा ए असलेला एकही रुग्ण पाहिला नाही. गेल्या तीन महिन्यांत केसेस जास्त होत्या; पण आता कमी झाल्या आहेत. दरम्यान, लोकांनी मास्क घालणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे आणि हाताची स्वच्छता राखणे यासारख्या प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. व्हायरस अनपेक्षितपणे वागू शकतात. कारण, आम्ही ऑफ-सीझनमध्येही वाढणारी प्रकरणे पाहिली आहेत.
- डॉ. मधुकर गायकवाड, मेडिसिन युनिट प्रमुख, जे. जे. रुग्णालय

अशी आहे आकडेवारी
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सध्या इन्फ्लुएंझा ए चे फक्त १६ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या पाच महिन्यांत तीन मृत्यू स्वाइन फ्लूमुळे आणि ६ मृत्यू एच३एन२ मुळे झाले आहेत. राज्यात इन्फ्लूएंझासारख्या आजाराची ५,५८,८९२ संशयित प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यामध्ये ३,७१९ लोक ओसेल्टामिवीर उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com