‘वंदे भारत’ एक्सप्रेसला उन्हाळी सुट्टीमुळे पसंती

‘वंदे भारत’ एक्सप्रेसला उन्हाळी सुट्टीमुळे पसंती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्या साडेतीन महिन्यांत शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने तब्बल तीन लाख १६ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे; तर डिसेंबरपासून सुरू झालेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसने पावणे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-साईनगर शिर्डी, सोलापूर आणि नागपूर-बिलासपूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या तिन्ही गाड्यांना उन्हाळी सुटीमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातही भर पडत आहे. सीएसएमटी-शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आल्या. मात्र वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला सुरुवातीला प्रवाशांचा सुटीच्या दिवशी तुफान प्रतिसाद मिळत होता. आता प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेन लोकप्रिय होत आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांत मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेनमधून एकूण एक लाख ६२ हजार ३२४ तर मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमधून एक लाख ५४ हजार ६४७ आणि नागपूर-बिलासपूर १ लाख ७४ हजार ४५० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
...
मे महिना सुसाट
वंदे भारत एक्स्प्रेस- तारीख-प्रवासी संख्या
२२२२३ सीएसएमटी-साईनगर शिर्डी - २० मे -१००.७९ टक्के
२२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी- २१ मे - १०३.६३ टक्के
२२२२५ सीएसएमटी-सोलापूर- १२ मे- ११९.४५ टक्के
२२२२६ सोलापूर-सीएसएमटी - २ मे- १५१.२४ टक्के
२०८२६ नागपूर-बिलासपूर- १९ मे- १३३.३९ टक्के
२०८२५ बिलासपूर-नागपूर- २३ मे- १३७.५४ टक्के
...
आधुनिक वंदे भारत
वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना विमानासारखा प्रवासाचा अनुभव प्रदान करणाऱ्या कवच तंत्रज्ञानासह प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या असंख्य उत्कृष्ट सुविधा देते. वंदे भारत ट्रेनमधील सर्व बाजूला १८० अंश फिरणाऱ्या आसनांच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसह असलेल्या आसनांची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये ३२ इंच स्क्रीन आहेत, ज्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट आहे. दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे आणि आसन क्रमांक ब्रेल अक्षरात असलेले आसन हँडलही देण्यात आले आहेत. जंतू-मुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट (UV) दिव्यासह टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम टॉयलेटची सुविधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com