मुंबई विमानतळावर प्रवाशांचा १० तास खोळंबा

मुंबई विमानतळावर प्रवाशांचा १० तास खोळंबा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : व्हिएतनाममधील होचिमिन्ह शहरात जाणाऱ्या ‘व्हिएतजेट’च्या विमानातील सुमारे ३०० प्रवासी विमानातील बिघाडामुळे मुंबई विमानतळावर सुमारे १० तास अडकून पडले होते. बराच विलंब होऊनही विमान कंपनीने प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था केली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

गुरुवारी (ता. २५) रात्री अकराच्या सुमारास व्हिएतजेट कंपनीचे विमान होचिमिन्ह शहरात जाण्याकरिता उड्डाण करणार होते; परंतु विमानाने वेळेत उड्डाण केलेच नाही. सुरुवातीला तांत्रिक समस्या असल्याचे सांगण्यात आले. नंतर विमानाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने ३०० प्रवाशांना पूर्ण रात्र विमानतळावरच काढावी लागली. त्यातच एअरलाइनकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले.

परवाना रद्द करण्यासाठी साकडे
डीजीसीएच्या नियमांनुसार एखाद्या विमानाला निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्यास प्रवाशांना निवास आणि भोजनाची व्यवस्था संबंधित विमान कंपनीने करणे आवश्यक आहे; परंतु संबंधित कंपनीने कोणतीही सुविधा न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. उड्डाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने संपातलेल्या प्रवाशांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘व्हिएतजेट’ या कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी ट्विट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com