जिजाऊ पोलिस अकादमीचे उत्तुंग यश

जिजाऊ पोलिस अकादमीचे उत्तुंग यश

विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) : महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये जिजाऊ अकादमीच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन तब्बल १८८ विद्यार्थ्यांची रेकॉर्ड ब्रेक निवड झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या पोलिस अकादमीचे नाव आता सर्वत्र चर्चेत आले आहे. मोठ्या संख्येने या अकादमीतील मुलांची निवड झाल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिजाऊ संस्थेच्या अकादमीचे नाव झाले आहे.
महाराष्ट्र पोलिस होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून या भरतीसाठी तरुण-तरुणी येत असतात. काहींना यश मिळते, तर काहींना अपयश. मात्र योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश मिळवणे फार अवघड नसते. ठाणे, पालघर, कोकणातल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि तेदेखील मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी २००८ पासून जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था ही विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे. भविष्यातील करिअरच्या आव्हानांसाठी मुला-मुलींनी तयार व्हावे, यासाठी मोफत पोलिस अकादमी, यूपीएससी / एमपीएससी अकादमी, जेईई, नीट, स्पर्धा परीक्षा मोफत क्लासेस आदी उपक्रम जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे स्वखर्चाने राबवत आहेत. याचा लाभ या भागांतील अनेक मुला-मुलींनी घेतला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेत अग्निशमन दलाच्या ९१० पदांची भरती प्रक्रिया पार पडली. यात जिजाऊ प्रशिक्षण केंद्र झडपोली येथून मोफत प्रशिक्षण घेतलेल्या जिजाऊ अकादमीच्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जिजाऊ पोलिस अकादमीचे १८८ विद्यार्थ्यांनी निवड झाली असून या भरतीमधील रेकॉर्ड ब्रेक निकाल दिला आहे.

शासकीय सेवेकडे झेप
आज येथील अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर चांगल्या पदांवर शासकीय सेवा बजावत आहेत. आजतागायत ५०० च्या वर अधिकारी घडले आहेत. तर आयपीसपर्यंतही काहींनी मजल मारली आहे. हजारोंच्या संख्येने पोलिस भरतीत येथील मुला-मुलींची निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com