रेल्वे पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण
रेल्वे पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण

रेल्वे पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद मजबूत करण्यासाठी वोक्हार्ट रुग्णालय आणि रेल्वे पोलिस व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रेल्वे पोलिस आणि कर्मचारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी रेल्वे आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह ५० हून रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय आणीबाणीला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना आवश्यक जीवनरक्षक कौशल्ये देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन डॉ. मिहिर शाह यांनी या वेळी सांगितले, की रेल्वे पोलिस आणि गार्डसना सीपीआर प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवत आहोत. रेल्वे दररोज लाखो प्रवाशांसाठी काम करते आणि सीपीआर प्रशिक्षणासह कर्मचाऱ्यांना सक्षम बनवल्याने सर्व प्रवाशांची सुरक्षा वाढते, असा दावा त्यांनी केला.