गॅस गळती होऊन स्फोट; दोघे जखमी

गॅस गळती होऊन स्फोट; दोघे जखमी

डोंबिवली, ता. २७ : डोंबिवली पूर्वेतील एका इमारतीतील घरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २८) दुपारी घडली. रोशनी बिष्णोई (वय ३८) व हनुमान बिष्णोई (वय २८) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली पूर्वेतील सांगर्ली येथील राम श्याम पाटील सोसायटीमध्ये बिष्णोई कुटुंबीय राहतात. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घरातील गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील खिडक्यांच्या काचा फुटून घरातील साहित्याचेदेखील मोठे नुकसान झाले. यामध्ये रोशनी बिष्णोई व हनुमान बिष्णोई हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com