आणखी आठ मार्गांवर प्रीमियम बसेस

आणखी आठ मार्गांवर प्रीमियम बसेस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : बेस्टने प्रवाशांच्या सेवेत आणखी ४० प्रीमियम बस दाखल केल्या आहेत. पुढील आठवड्यात बुधवारपासून (ता. ३१) आठ मार्गांवर या लक्झरी प्रीमियम बसेस धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. या बसने नव्याने प्रवास करणाऱ्यांसाठी १३४ रुपयांचे सिंगल तिकीट फक्त ४५ रुपयांत मिळणार आहे. सध्या ५६ प्रीमियम बस असून नव्याने ४० बस दाखल झाल्याने या बसेसची संख्या ९६ वर पोहोचली आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने १२ डिसेंबर २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रीमियम बसेस आणल्या आहेत. ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी, मुंबई विमानतळ ते खारघर, विमानतळ ते कुलाबा, ठाणे ते पवई (हिरानंदानी) या दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू आहे.
या प्रीमियम बसेसना प्रवाशांची पसंती मिळत आहे. सध्या ५६ प्रीमियम बसेस असून रोज आठ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यात आणखी ४० प्रीमियम बस दाखल झाल्या असून त्या बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत असतील.

मोबाईलवर सर्व माहिती
बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीवर भर दिला असून, ‘चलो ॲप’वर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाते; परंतु प्रीमियम लक्झरी बसने प्रवास करण्यासाठी आधी ‘चलो ॲप’वर तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहे. तसेच या बसमध्ये उभ्याने प्रवास बंदी असल्याने प्रवाशांना आधी तिकीट बुकिंग करणे गरजेचे आहे. प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी बस कुठपर्यंत आली, सीट आहे की नाही, किती वेळात बस इच्छितस्थळी पोहोचणार आदी माहिती प्रवाशांना मोबाईलवर उपलब्ध होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com