कल्याणमध्ये महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’चा मोफत शो

कल्याणमध्ये महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’चा मोफत शो

कल्याण, ता. २८ (बातमीदार) : माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाऊंडेशनच्या वतीने पारनाका, गांधी चौक, आधारवाडी कल्याण पश्चिम येथील महिला व मुलींना ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. याला मोठ्या प्रमाणात महिला व मुलींनी प्रतिसाद दिला. या वेळी कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी भाषण करताना, मुली व महिलांनी जागृत राहून लव जिहादसारख्या गोष्टी घडत आहेत ते थांबवण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन याप्रति काम करण्याची गरज आहे, असे आवाहन केले. या वेळी भाजयुमो प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, भाजपा मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळे, सदा कोकणे, विवेक गायकर, हिमांशू पवार, किशोर खैरनार, राहुल भोईर, दीपक घुगे, रूपचंद राठोड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com