पनवेलमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

पनवेलमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

कामोठे, ता. २८ (बातमीदार) : राज्य सरकारस्तरावर जन कल्याणाच्या विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत. पनवेल तहसील कार्यालय अंतर्गत या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.
कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. सरकारी यंत्रणा योजनांचा प्रचार करण्यावर भर देत आहे; परंतु या योजनांची माहिती, कागदपत्रांची पूर्तता याविषयी पुरेशी माहिती मिळत नसल्याने सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयात या अंतर्गत रेशन कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, नवमतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ज्येष्ठ नागरिक कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, जन्म व मृत्यूच्या दाखल्यासाठी एकूण ७, ६७३ अर्ज आले होते. त्यापैकी ६,५५९ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे; तर मतदार नोंदणीचे ६९६ अर्ज मुदतीवर नोंदणीस प्रलंबित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com